9 मार्च रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे होणार पुरस्काराचे वितरण
मित्रपरिवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड । दिव्य रिपोर्टर
येथील रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हे दरवर्षी समाजात उत्कृष्ट काम करणार्या समाजकर्त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करतात. यंदाचा समाजरत्न पुरस्कार रयत सामाजिक प्रतिष्ठानने दिव्य आधारचे संपादक शेख रिजवान यांना जाहीर केला असून येत्या 9 मार्च रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. सर्व मित्रपरिवारांनी या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
रयत सामाजिक प्रतिष्ठान हे मागील तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच कोरोना काळात समाजातील गरजूंना मदत करणारे, वृक्षारोपन करणारे, रक्तदान शिबिर घेणारे तथा समाजकार्यात अग्रेसर असणार्यांना या प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समाजसेवकांना पुरस्कार जाहीर झाले असून समाजरत्न पुरस्काराने पत्रकार शेख रिजवान यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याशिवाय बीड शहरातील सुशिल खटोड, भागवत वैद्य यांच्यासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मान्यवरांनाही पुरस्कार जाहीर झाले असून दि.9 मार्च रोजी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व मित्रपरिवारांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रयत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.जी.माने यांनी केले आहे.
रयत सामाजिक प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पत्रकार शेख रिजवान यांना जाहीर
