अर्धमसला मस्जिदमध्ये स्फोट, घडलेली घटना निंदनीय, पोलीस प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद
बीड / दिव्य रिपोर्टर
शनिवारी पहाटे गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात काही तरुणांनी जिलेटिनच्या कांड्या लावून स्फोट घडून आणला या स्फोटात मस्जिदचे नुकसान झाले, घटनेची माहिती पसरतात जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलीस प्रशासनाने घटनेची तात्काळ दखल घेत अर्धमसला गावात जाऊन घटनेची चौकशी करून तात्काळ याप्रकरणी फिर्याद घेऊन दोन आरोपींना अटक केली पोलिसांच्या या भूमिकेमुळे पसरलेला तणाव कमी झाला, विविध संघटनांनी अर्धमसला गावात जाऊन मस्जिदची पाहणी करून या संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात मागणी केली, अर्धमसला गावातील लोकांनी याप्रकरणी संयम राखला व शांततेचे आव्हान केले या घटनेची माहिती मिळताच जमात उलमा महाराष्ट्राचे सदर मौलाना हफिज नदीम अहमद सिद्दीकी यांनी स्वतः अर्धमसाला गावात जाऊन पूर्ण घटनेची सहनिशा करून घटना निंदनीय असली तरी पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई अभिनंदननी आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शांततेचे आवाहन केले
शनिवारी पहाटे गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मस्जिदमध्ये स्फोट झाला ही घटना पोलीस प्रशासनाला समजतात पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली, घटना गंभीर असल्याने आय .जी. वीरेंद्र मिश्र यांनी आपली उपस्थिती दर्शवली परंतु पोलीस अधीक्षक नवनीत कावंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी घडलेल्या घटनेची दखल घेत अवघ्या तीन तासात आरोपी विजय गव्हाणे व श्रीराम सागळे या दोघांना अटक करून शांततेचे आवाहन केले तसेच गावातील काही ज्येष्ठांनी आपल्या वतीने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रकाशित करून शांततेचे आवाहन केले होते, या घटनेचे गांभीर्य पाहून जमाती उलमा महाराष्ट्रचे सदर मौलाना हफिज नदीम अहमद सिद्दिकी यांनी घटनेचे पूर्ण डिटेल्स घेऊन घडलेली घटना निंदनीय आहे परंतु पोलीस प्रशासनाने घेतलेली दखल समाधानकारक असून पोलिसांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे सांगितले तसेच या घटनेमागे काही षडयंत्र आहे का ? याचाही पोलीस प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी मौलाना नदीम सिद्दिकी यांनी केली तसेच सामाजिक सलोखा कायम ठेवत घडलेला प्रकार शांततेने हाताळावा असे आव्हान मौलाना सिद्दिकी यांनी केल्याने सध्या परिस्थिती आटोक्यात आहेत
जमात उलमा महाराष्ट्रचे सदर मौलाना नदीम सिद्दिकी यांचे शांतता ठेवण्याचे आवाहन
