19.4 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

आऊटवर्ड नंबरवरून होणार बोगस अपंग शिक्षकांची पोलखोल

जे.जे.रुग्णालयातून तपासणी करून आणलेले अपंगाचे प्रमाणपत्र संशयाच्या विळख्यात
दिव्य आधारच्या प्रतिनिधीने त्या सतरा अपंग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी केल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ
प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी दिव्य आधारच्या प्रतिनिधीचे अभिनंदन करून संबंधित कर्मचार्‍यांना दिले अल्टिमेट
जि.प.नवनिर्वाचित सीईओ जीवने यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्वच अपंग कर्मचार्‍यांचे प्रमाणपत्र तपासून घेणे आवश्यक, मोठी खळबळ होण्याची शक्यता
जे.जे.मधून तपासणी करून आणलेले अपंग प्रमाणपत्र जर बोगस निघाले तर संबंधित बोगस शिक्षकांवर 420 चा गुन्हा दाखल होण्याची शक्यता
जे.जे.रुग्णालयातून तपासणी होवून आलेल्या काही प्रमाणपत्रावर सारखेच आऊटवर्ड नंबर, काही प्रमाणपत्र मराठीत टाईप केलेले तर काही प्रमाणपत्र इंग्रजीत, मराठीत टाईप केलेल्या प्रमाणपत्रावर जे.जे.रुग्णालयाचा लोगो, इंग्रजीत असलेल्या प्रमाणपत्रावर लोगो नसल्याने कोणते प्रमाणपत्र खरे कोणते खोटे? प्रमाणपत्र पडताळणी होवून आल्यानंतरच समजून येणार
तत्कालीन जि.प.सीईओ अजित पवार यांनी 40 संशयीत अपंग शिक्षकांचे प्रमाणपत्र जे.जे.रुग्णालयातून तपासणी करून घेण्याचे केले होते आदेशित, त्यापैकी 19 अपंग शिक्षकांनी जे.जे.रुग्णालयात तपासणी करून अपंग प्रमाणपत्र केले होते सादर, त्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्या शिक्षकांना मिळाल्या पुनर्नियुक्त्या, उर्वरित अपंग शिक्षकांची कोर्टात धाव
या सतरा अपंग प्रमाणपत्रापैकी काही प्रमाणपत्र ओरिजनल तर काही प्रमाणपत्र बनावटी असल्याचा संशय, झेरॉक्स दुकानातून खाडाखोड करून बोगस प्रमाणपत्र तयार केल्याची चर्चा, मिळालेल्या माहितीनुसार जे.जे.रुग्णालयाच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने प्रति अपंग प्रमाणपत्र तीन लाख रुपये घेतल्याची चर्चा, सीबीआय चौकशीची गरज
नोकरी मिळविण्यासाठी सादर केलेले अपंग प्रमाणपत्र वेगळेच आणि पुर्नतपासणीसाठी जे.जे.रुग्णालयात गेलेल्याने दुसरेच अपंगत्वाचे आजार दाखवून प्रमाणपत्र मिळविल्याची शंका, मोठी पोलखोल होण्याची शक्यता
बीड प्राथमिक शिक्षण विभागाने जे.जे.रुग्णालयातून आणलेल्या अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर पुनर्नियुक्त्या देताना प्रमाणपत्रावर सारखेच आऊटवर्ड नंबर, काही प्रमाणपत्र इंग्रजीत तर काही प्रमाणपत्र मराठीत, काही प्रमाणपत्रावर जे.जे.हॉस्पिटलचा लोगो तर काही प्रमाणपत्र विनालोगोचे, ही बाब संबंधित अधिकार्‍याच्या निदर्शणास का आली नाही? मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय, संबंधित अधिकार्‍याचीही सखोल चौकशी करण्याची गरज

बीड :
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात काही शिक्षक अपंग असल्याने या बदल्याचा लाभ त्यांना व त्यांच्या पाल्यांना मिळाला होता. या बदल्यामध्ये काही बोगस अपंग शिक्षकांनी लाभ घेतल्याची तक्रार झाल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत काही संशयीत बोगस शिक्षकांनी आपल्या अपंगत्वाची पुर्नतपासणी जे.जे.रुग्णालयात करण्याचे आदेशित केले. यातील काही अपंग शिक्षकांच्या पाल्यांनी माफीनामा देवून आपले पद कायम ठेवले परंतु जे अपंग होते त्यांना जे.जे.मध्ये जावून तपासणी करणे गरजेचे असल्याने काही शिक्षकांनी कोर्टात धाव घेतली तर काहींनी जे.जे.मध्ये तपासणी करून पुन्हा आपल्या पदावर पुनर्नियुक्त्या मिळविल्या.यात 19 शिक्षकांनी जे.जे.मधून पुर्नतपासणी करून तेथील प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना पूर्वपदावर घेण्यात आले. या 19 अपंग शिक्षकांनी जे.जे.मधून खरोखरच तपासणी केली का? हा शिक्षणविभागात चर्चेचा विषय असल्याने दिव्य आधारच्या प्रतिनिधीने नियमाने अर्ज करून या 19 पूर्वनियुक्त्या मिळविलेल्या अपंग शिक्षकांच्या जे.जे.मधून तपासणी करून आलेल्या प्रमाणपत्राची मागणी केली. प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी तात्काळ अर्जाची दखल घेत 19 पैकी 17 अपंग प्रमाणपत्राची माहिती दिली. दिव्य आधारच्या प्रतिनिधीने या प्रमाणपत्राचा बारकाईने पाठपुरावा केला असता यातील काही अपंग प्रमाणपत्रावर आऊटवर्ड नंबर डबल म्हणजे सारखेच दिसून आले. तर काही अपंग प्रमाणपत्र इंग्रजीत तर काही अपंग प्रमाणपत्र मराठीत टाईप केलेले असल्याने जे.जे.मधून आणलेले अपंग प्रमाणपत्र संशयाच्या विळख्यात दिसून आल्यानंतर संबंधित प्रतिनिधीने हे सर्व सतरा प्रमाणपत्र जे.जे.रुग्णालयातून तपासणी करण्याची मागणी केली. या मागणीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणविभागात खळबळ उडाली असून नेमके हे प्रमाणपत्र जे.जे.रुग्णालयातूनच तपासणी करून आणले की, झेरॉक्स दुकानावर खाडाखोड करून तयार करण्यात आले? असा संशय निर्माण झाला असून याप्रकरणी शिक्षणाधिकारी फुलारी यांनी दिव्य आधार प्रतिनिधीचे अभिनंदन करून संबंधित अधिकार्‍यांना अल्टिमेट देवून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेशित केले आहे.
तत्कालीन सीईओ अजित पवार यांनी शिक्षणविभागच नव्हे तर जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्‍या सर्व अपंग कर्मचार्‍यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र तपासणी करण्याचे आदेशित केले होते. परंतु अजित पवार यांची बदली झाल्यानंतर हे प्रकरण थांबविण्यात आले. आताचे नवनिर्वाचित सीईओ आदित्य जिवने यांनी पुन्हा जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्‍या सर्वच अपंग कर्मचार्‍यांचे प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून यातून मोठी खळबळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तत्कालीन सीईओ यांनी सर्वप्रथम शिक्षणविभागातील बदलीचा लाभ घेणार्‍या अपंग शिक्षकांच्या तपासण्या केल्या. यात अनेक अपंग शिक्षक बोगस असल्याच्या संशयावरून अजित पवार यांनी या सर्व शिक्षकांना जे.जे.रुग्णालयातून अपंगाची तपासणी करून प्रमाणपत्र आणण्याचे आदेशित केले. यातील काही शिक्षक सीईओंच्या आदेशाविरोधात कोर्टात गेले तर काही शिक्षकांनी जे.जे.रुग्णालयातून तपासणी करून पुन्हा पदावर कायम झाले. ज्या शिक्षकांनी जे.जे.रुग्णालयात अपंगत्वाची तपासणी केली अशा 19 शिक्षकांना शिक्षणविभागाने पुनर्नियुक्त्या दिल्या. परंतु यातील काही अपंग शिक्षकांनी जे.जे.मधून सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र संशयीत दिसून आल्याने दिव्य आधारच्या प्रतिनिधीने याप्रकरणी पाठपुरावा केला असता काही अपंग प्रमाणपत्रावर सारखेच आऊटवर्ड नंबर दिसून आले तर काही प्रमाणपत्र इंग्रजीत तर काही प्रमाणपत्र मराठीत टाईप केलेले दिसून आल्यानंतर एकंदरीत या प्रमाणपत्रासंदर्भात संशय निर्माण झाला. त्या दृष्टीकोनातून हे सर्व प्रमाणपत्र जे.जे.रुग्णालयातून तपासणी करून घेण्याची मागणी दिव्य आधारच्या प्रतिनिधीने शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्याकडे तक्रारी अर्ज देवून केली. या तक्रारी अर्जानंतर शिक्षणविभागात मोठी खळबळ उडाली असून कदाचित यातील काही प्रमाणपत्र ओरिजनल असतील किंवा जे.जे.रुग्णालय प्रशासनाकडून प्रमाणपत्रावर चुकीने डबल व सारखेच आऊटवर्ड नंबर नमूद झाले असतील. जर असे झाले असेल तर वेगळी बाब आहे. तसेच काही इंग्रजीत तर काही मराठीत प्रमाणपत्र आहेत. कदाचित जे.जे.रुग्णालयात असे प्रमाणपत्र देण्याची तरतूद असेल तर ही पण बाब वेगळीच आहे. परंतु अशाप्रकारे प्रमाणपत्र असतील तर संशय निर्माण होणारच. या दृष्टीकोनातून दिव्य आधारच्या प्रतिनिधीला शंका निर्माण झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी करून घेण्यास काय हरकत आहे. म्हणून याप्रकरणी तक्रारी अर्ज दाखल झाला असून शिक्षणाधिकारी यांनी याप्रकरणाची कसून चौकशी करण्याची गरज आहे.

जे.जे.रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी पारदर्शक चौकशी करावी

दिव्य आधारच्या प्रतिनिधीने सर्वप्रथम प्राथमिक शिक्षणविभाग बीड यांच्याकडे अर्जाद्वारे जे.जे.रुग्णालयातून तपासणी करून आलेल्या अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची मागणी केली. शिक्षणविभागाने पारदर्शकता दाखवत तात्काळ ती माहिती दिली. परंतु प्रमाणपत्रात अनेक त्रुटी दिसून आल्याने दिव्य आधारच्या प्रतिनिधीने जे.जे.रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी जे.जे.रुग्णालयात अपंग विभागाचा नंबर देवून यांच्याकडे सर्व माहिती देण्याचे सांगितले. संबंधित प्रतिनिधीने त्या नंबरवर संपर्क करून याप्रकरणी पाठपुरावा करण्यासंदर्भात सांगितल्यानंतर अपंग विभागातील संबंधित कर्मचार्‍याने आपण हे अर्ज शिक्षण विभागामार्फत तपासणीसाठी पाठवावे असे नियमाने सूचित केले. त्यादृष्टीकोनातून दिव्य आधारच्या प्रतिनिधीने बीड शिक्षणविभागाकडे या सतरा अपंग प्रमाणपत्राची जे.जे.रुग्णालयातून पडताळणी करून घेण्यासाठी अर्ज सादर केला असून संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर सर्व काही समोर येणार हे मात्र खरे आहे. यासाठी जे.जे.रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी पारदर्शक चौकशी करण्याची गरज आहे.

पुनर्नियुक्त्या देण्यापूर्वी शिक्षणविभागाच्या निदर्शणास ही बाब का आली नाही?
जे.जे.रुग्णालयातून अपंगत्वाची तपासणी करून काही शिक्षकांनी नियमाने जे.जे.रुग्णालयातून मिळालेले अपंग प्रमाणपत्र बीड शिक्षणविभागात सादर करून पुनर्नियुक्त्या मिळविल्या. यात महत्त्वाचे म्हणजे काही अपंग प्रमाणपत्रावर सारखेच आऊटवर्ड नंबर आहे. तसेच काही प्रमाणपत्र इंग्रजीत नमूद असून त्या इंग्रजीतील प्रमाणपत्रावर तीन डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या आहेत. तर मराठीतील प्रमाणपत्रावर फक्त एकच स्वाक्षरी असून वेगवेगळ्या नमुण्यात जे.जे.रुग्णालयाने अपंगाचे प्रमाणपत्र कसे दिले? तसेच इंग्रजी प्रमाणपत्रावर जे.जे.रुग्णालयाचा लोगो नमूद नाही परंतु मराठीत टाईप केलेल्या प्रमाणपत्रावर जे.जे.रुग्णालयाचा लोगो दिसून येतो. ही बाब पुनर्नियुक्त्या देणार्‍या बीड शिक्षणविभागातील अधिकार्‍यांच्या निदर्शणास का आली नाही? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असून या पुनर्नियुक्त्या देताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने आता त्या संबंधित अधिकार्‍यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

जे.जे.रुग्णालयाच्या संपर्कात असलेला तो व्यक्ती कोण? की झेरॉक्स दुकानावर झाले कांड?
जे.जे.रुग्णालयातून तपासणी करून आलेल्या काही अपंग शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याने या सर्वच प्रमाणपत्राची तपासणी करण्याची मागणी दिव्य आधारच्या प्रतिनिधीने केली असून मिळालेल्या माहितीनुसार जे.जे.रुग्णालयाच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने मोठा आर्थिक व्यवहार करून प्रति प्रमाणपत्र तीन लाख रुपये घेवून हे प्रमाणपत्र तयार करून दिल्याची चर्चा असून जे.जे.रुग्णालयाच्या संपर्कात असलेला तो व्यक्ती कोण? किंवा एखाद्या ओरिजनल प्रमाणपत्रात खाडाखोड करून झेरॉक्स दुकानात बसून हे कांड करण्यात आले? याचीही सखोल चौकशी करण्याची गरज असून ज्यांचे प्रमाणपत्र ओरिजनल आहेत त्यांनी या बातमीचा कोणतेही टेन्शन घेवू नये.
————

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!