रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी नागरिकांनी
बहुसंख्येने उपस्थित रहावे
अमर नाईकवाडे, फारूक पटेल यांचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील बहुप्रतिक्षीत जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (मोंढा रोड) या सिंमेट रस्ता कामा सह बीड शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी प्रभाग 2 सह बीड शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक अमर नाईकवाडे व गटनेते फारूक पटेल यांनी केले आहे.
बीड शहरातील जिजामाता चौक या रस्ता कामाचा शुभारंभ आज सायंकाळी पार पडणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उपस्थिती राहणार आहे. आज दि. 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता या रस्ता कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. नव्या आणि जुन्या बीड शहराला जोडणार्या या महत्वाचे रस्ता काम मार्गी लावल्याबद्दल नगरसेवक अमर नाईकवाडे व गटनेते फारुक पटेल यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (मोंढा रोड) या कामासाठी 4 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असून आता आज रविवारी या रस्ता कामाचे प्रत्यक्षात काम सुरू होत आहे बहुप्रतिक्षित रस्ता काम मार्गी लागल्यामुळे नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे बीड शहराच्या व्यापारी पेठेला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे.
मुंडा रोड सह खालील रस्ता कामांचे देखील उद्घाटन उद्याच एकत्रित रित्या होणार आहे.
1) शिव शारदा बिल्डिंग मोंढा रोड ते अमरधाम स्मशानभूमी सिमेंट रस्ता व डिव्हाइडर सह.
2) बीड न प हदीमध्ये प्रभाग 3 मधील सुराणा यांचे घर ते एकशिंगे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.
3) बीड न.प. हद्दीमध्ये प्रभाग 3 मधील रामतीर्थ येथे श्रद्धा क्लिनिकच्या मागील बाजूस सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.
4) बीड न. प. हद्दीमध्ये प्रभाग 3 मधील काळा हनुमान ठाणा येथे दर्गा कडे जाण्यासाठी ओढ्यावरील पूल व शुक्रवार पेठ येथे तकवा परिसरात जाण्यासाठी ओढ्यावरील पूल बांधकाम करणे.
5) बीड न.प. हद्दीमध्ये प्रभाग 2 मध्ये अरुण केदार ते नलावडे व अभिषेक जोशी ते साळुंके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.
6) बीड नप हद्दीमध्ये प्रभाग 3 मध्ये 1)भारत शिरसागर ते सचिन गालफाडे (हनुमान नगर) 2) जैन घर ते नलावडे घर 3)चरखा घर ते मुंदडा घर 4)नितीन सारडा ते उमेश कासट रस्ता व नाली बांधकाम करणे.
7) बीड नप हद्दीमध्ये प्रभाग 3 मध्ये मोंढा ते बामणवाडी जोडणारा पूल रुंदीकरण व बांधकाम करणे.
8) बीड नप हद्दीमध्ये प्रभाग 24 मध्ये गुजर कॉलनी येथे 1)पप्पू गुजर ते राऊत 2)राऊत ते ओढा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.
9) बीड नप हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये काळे यांचे घर ते धायरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.
10) बीड न.प. हद्दीमध्ये प्रभाग 24 मध्ये पालवन रोड संजय शिरसाट ते राहुल कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता नाला बांधकाम करणे.
11) बीड नप हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये गलधर कॉम्प्लेक्स ते देशमुख यांचे घर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.
12) बीड न प हद्दीमध्ये प्रभाग 10 मध्ये डॉक्टर नागेश चव्हाण यांचे घर ते बाळासाहेब कुलथे यांचे घर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.( शिक्षक कॉलनी)
13) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मध्ये 1)शकील बिल्डर 2)जावेद सर ते डी.बी. खान 3) मस्तान सर ते गांधले मॅडम 4)खानका मज्जिद ते एम आर इंटरप्राईजेस पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
14) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मध्ये रईस घर ते डोंगरे ताई 2) लाल मामु ते आलिम पटेल 3) राजू भाई ते वाहिद मौलाना यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
15) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.20 मध्ये फिरोज मोमीन ते मजीद टेलर, जाहीर टेलर ते साऊद भाई, मोहम्मद खालीद ते बबलू भाई यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे.
16)बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र 3 मध्ये अमरधाम स्मशानभूमी मध्ये पेवर ब्लॉक बसवणे.
17) बीड नगरपरिषद अंतर्गत बँक कॉलनी रामकृष्ण नगर महादेव मंदिर येथे पेवर ब्लॉक बसविणे.
18) बीड नगरपरिषद अंतर्गत मोमीनपुरा रोड ते निळकंठेश्वर महादेव मंदिर पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे.
19) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मध्ये एक एक मिनार मस्जिद ते मदिना पार्क पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
20) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 21, 6, 7 मध्ये 1) कुरेशी गल्ली ते शादी खान 2) पाकीजा किरण ते मुफ्ती साहब 3) जुनी भाजी मंडई ते मजदूर भवन पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
21) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मध्ये 1) रियाज मनियार ते राजू सर 2) सिकंदर भाई ते नजीर भाई तेलगाव नाकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
22) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मध्ये कारंजा खंदक ते ग्रीन मंजिल पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
23) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1) मुंडे घर ते तोटे घर 2) घोडके घर ते तुळजाभवानी मंदिर पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
24) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मध्ये पांगरी रोड ते घरत यांचे घर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
25) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र 1 मध्ये गयानगर( संस्कार कॉलनी) येथे चौरे यांचे घर ते म्हेत्रे यांचे घर येथे सिमेंट काँक्रीट चा रस्ता व नाली बांधकाम करणे.
26) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 5 मध्ये माऊली चौक ते हिरालाल चौक आणि सरवदे गल्लीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
27) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मध्ये शाहूनगर येथील सुनील अनभुले घर ते बाजीराव चव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
28) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मध्ये रामतीर्थ येथील 1)अण्णाभाऊ साठे पुतळा ते दशरथ दळवी 2) जानु जगताप ते सीताबाई आरे 3)सीताबाई आरे ते सखाराम तावरे पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे.
29) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मध्ये शुक्रवार पेठ मज्जिद ते विप्रनगर पुलापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे.
30) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मध्ये हनुमान नगर येथील लहुजी साळवे चौक ते पवार यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे.
31) बीड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 21 मध्ये 1) शेख शरीफ ते शेख वाहेद 2) सय्यद अय्युब ते शेख नय्युम 3) नासेर पठाण ते माजेद मोमीन 4) हनिफा चौक ते हजरत बालेपीर उर्दू शाळा पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
32) बीड न. प. हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील जुना मोंढा येथील भिमनगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.