सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाव्यासही राहणार उपस्थित
बीड (दि. 11) – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे यावर्षी दसऱ्याच्या दिवशी संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भगवानगड येथे सकाळी साडेदहा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत. दसरा हा भगवानगडाचा स्थापना दिवस असून येथे अनेक वर्षांपासून सीमोल्लंघन करण्याची परंपरा आहे.
सकाळी दहा वाजता धनंजय मुंडे हे बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून हेलिकॉप्टर द्वारे श्रीक्षेत्र भगवानगडाकडे प्रयाण करतील. भगवान गडाचे दर्शन झाल्यानंतर धनंजय मुंडे हे पुढे पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील श्री क्षेत्र भगवान भक्तीगड येथे आ.पंकजाताई मुंडे यांच्या वतीने आयोजित करणाऱ्या करण्यात आलेल्या दशकपूर्ती दसरा मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत.
भगवानगड येथून धनंजय मुंडे हेलिकॉप्टर द्वारे साधारण साडेअकरा वाजता सावरगाव घाटकडे प्रयाण करतील. भगवान भक्ती गड येथे आ.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आयोजित दशकपूर्ती दसरा मेळाव्याला उपस्थित राहून त्यानंतर नामदार मुंडे हेलिकॉप्टरने परत परळी वैजनाथ कडे रवाना होतील.