तरुण पिढीत व सर्व समाजात गलधर यांची वाढती लोकप्रियता
गलधर यांनी जरांगे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली नसली तरी मतदाता मात्र गलधर यांना उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात
जर बीड विधानसभेची उमेदवारी स्वप्नील गलधर यांना मिळाली तर बीडच्या राजकारणात मोठी खळबळ होणार तसेच नवीन चेहराही मतदात्यांना मिळणार
बीड । दिव्य रिपोर्टर
गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत बीडमधून अनेकांनी आपली इच्छा जाहीर करत पाटलांची भेट घेतली. परंतु पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी सोबत असणार्या स्वप्नील गलधर यांनी कधीच बीड विधानसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवार म्हणून आपली इच्छा जाहीर केलेली नव्हती गलधर यांनी इच्छा जाहीर केलेली नसली तरी स्वप्नील गलधर यांना बीड विधानसभेची उमेदवारी द्यावी म्हणून मतदाताच इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. जर बीड विधानसभेची उमेदवारी गलधर यांना मिळाली तर बीडच्या राजकारणात मोठी खळबळ होणार, तसेच बीडच्या मतदात्यांना नवीन चेहराही मिळणार म्हणून मतदातेही स्वप्नील गलधर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. तसेच आतापर्यंत जरी स्वप्नील गलधर यांनी उमेदवारीची मागणी केली नसली तरी आता मात्र जरांगे पाटलांनी उमेदवारी दिली तर निवडणूक लढविणार अशी भूमिका स्वप्नील गलधर यांनी घेतली असल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली असून तरुण पिढीत व सर्व समाजात गलधर यांची वाढती लोकप्रियता पाहून जरांगे पाटलांनी तरुण तडफदार उमेदवार म्हणून स्वप्नील गलधर यांच्या पाठीवर थाप देण्याची अत्यंत गरज आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापितांच्या ताब्यात बीड विधानसभा असल्याने आजही रस्ते, पाणी व इतर प्रश्न चव्हाट्यावर आहेत. यासाठी मतदाता जुन्या उमेदवारांना कंटाळलेला असून नवीन चेहर्याला मतदाता प्राधान्य देणार, एकंदरीत बीडच्या राजकारणाचे असे चित्र दिसून येत आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना समाजसेवेतून तसेच आपल्या कार्यशैलीतून नावलौकीक केलेले स्वप्नील गलधर यांची वाढतील लोकप्रियता पाहून जरांगे पाटलांनी सर्वसामान्य कुटुंबातील स्वप्नील गलधर यांना उमेदवारी द्यावी अशी मतदात्यांनीच पाटलांकडे मागणी केली असून जर स्वप्नील गलधर यांना बीड विधानसभेची उमेदवारी मिळाली तर बीडच्या राजकारणाचे चित्र बदलणार हे मात्र निश्चित आहे. तसेच स्वप्नील गलधर गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. परंतु त्यांनी कधीच स्वत:साठी राजकारणाचा लाभ घेतलेला नाही. परंतु स्वप्नील गलधर यांनी अनेक राजकीय दिग्गजांना पाठबळ देवून त्यांना निवडूण आणले असा मोठा अनुभव गलधर यांना असल्याने बीड विधानसभेच्या निवडणूकीत या अनुभवाचा मोठा लाभ जरांगे पाटलांना होणार हे मात्र खरे आहे. तसेच बीडच नव्हे तर ग्रामीण भागातही स्वप्नील गलधर यांचा बोलबाला असून जिल्हा रुग्णालय असो की, पोलीस ठाणे असो, तसेच दिवस असो की रात्र असो 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार्या नि:स्वार्थ मनाचा व्यक्ती म्हणून स्वप्नील गलधर यांची बीडच नव्हे तर जिल्ह्यात छबी निर्माण झालेली आहे. यातून बीड विधानसभेच्या निवडणूकीत मतदात्यांची पहिली पसंत म्हणून स्वप्नील गलधरच पुढे राहणार यात काही शंका नाही.
मराठा आरक्षणासाठी राजकारणातून बाहेर
स्वप्नील गलधर यांची राजकीय सुरुवात राष्ट्रवादीतून झाली असली तरी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या शब्दाला मान देवून त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर माजीमंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई व प्रितमताईंना वेळोवेळी साथ दिली. राजकारणात सक्रीय असताना स्वप्नील गलधर यांच्याकडे महत्त्वाची पदे देण्यात आली. पदावर असतानाही गलधर यांनी सर्वांना न्याय मिळवून दिला परंतु ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला त्यावेळी स्वप्नील गलधर यांनी स्वत:चे भविष्य न पाहता मराठा आरक्षणासाठी राजकारणातून बाहेर पडले. ज्याअर्थी स्वप्नील गलधर आरक्षणासाठी जरांगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून झटले त्याअर्थी समाजही त्यांच्या पाठिशी आज ठाम उभा राहणार हे मात्र खरे आहे. तसेच निवडणूकीतही याचा मोठा लाभ स्वप्नील गलधर यांना समाज देणार हे पण सत्य आहे.
सर्व समाजात लोकप्रियता
स्व.अमोल गलधर यांचे बंधू म्हणून स्वप्नील गलधर यांची ओळख असली तरी स्वप्नील गलधर यांनी स्वबळावर रुग्णसेवेतून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रुग्ण कोणत्याही समाजाचा असो स्वप्नील गलधर यांच्याकडे मदतीची मागणी केल्यानंतर स्वप्नील गलधर यांनी 24 तास रुग्णांच्या सेवेत सक्रीय राहून त्यांची सेवा केली. विशेष म्हणजे यातूनच स्वप्नील गलधर यांची खरी ओळख निर्माण झाली असून कोणतेही पद किंवा सत्ता नसतानाही रुग्णसेवेतून गलधर यांनी ईश्वरसेवा घडविली. यातून प्रत्येक समाजात गलधर यांची चांगली ओळख निर्माण झालेली असून याचाही विधानसभेत मोठा फायदा होणार, फक्त जरांगे पाटलांनी स्वप्नील गलधर यांच्या पाठीवर थाप देण्याची गरज आहे.
——–