18.5 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

फ्रॉड जीएसटी अकाउंटचे पतसंस्थेतून हवाला कांड बीडमधून कोट्यवधीची जीएसटी टॅक्सची बिले बुडीत खात्यात जमा

बनावट फर्मवाले, बोगस बिले आणून देणारे एजंट झाले गब्बर
मिस्त्रीकाम करणारे, पेंटर, मजूरी कामगार यांच्या नावाने फर्म व जीएसटी अकाउंट
बनावट जीएसटी क्रमांकाचे अकाउंट एखाद्या पतसंस्थेत उघडायचे, बिलावरील जीएसटी क्रमांकावर कपात झालेले पैसे टॅक्स विभगाात न जाता त्या पतसंस्थेत जमा करायचे, नंतर ते पैसे जीएसटीचे फर्मचालक वापरायचे असे षडयंत्र सुरू असल्याची चर्चा

त्या फर्ममधून बिल घेणारे कॉन्ट्रॅक्टर, ट्रेडर्स चालक किंवा इतर व्यापारी यांना जीएसटी क्रमांकासहीत बिल मिळत असल्याने त्यांना जीएसटी भरल्याचा संभ्रम, परंतु जीएसटी त्या फर्मधारकाच्या खात्यात जमा
विशेष म्हणजे ती फर्मही बोगस व्यक्तीच्या नावाने सुरू असल्याने टॅक्स डिपार्टमेंट कारवाई कोणावर करणार? म्हणून त्या फर्ममधून बिले घेणारे अडचणीत, व्यापार्‍यांना डबल फटका
अज्ञात व्यक्तीचे पॅनकार्ड, आधारकार्ड वापरून फ्रॉड फर्म सुरू करायचे आणि त्या फर्मच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करायचा, असा खेळ सुरू असल्याची शंका, मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे चित्र
जीएसटी खाते उघडण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागते,

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर नियमाने संबंधित विभाग त्या फर्मला मंजूरी देवून जीएसटी क्रमांक देते, ती फर्म कोठे आहे, त्या फर्मचा प्रोप्रायटर कोण? पाहणी करूनच त्या फर्मला मंजूरी देणे अपेक्षीत, फर्मला मंजूरी देणार्‍या विभागाचे अधिकारी, कर्मचारी मॅनेज असल्याची शंका
बनावट कागदपत्राच्या आधारावर तयार केलेल्या फर्ममधून बोगस बिले आणून देणारे एजंट सक्रीय, संबंधित फर्मला तीन टक्के तर बिले आणून देणार्‍या एजंटला एक टक्का अशाप्रकारे टक्केवारीचा खेळ सुरू असल्याची चर्चा
शासकीय कामांची बिले उचलण्यासाठीही बोगस बिलांचा वापर केल्याचे चित्र, टॅक्स विभागाने शासनाकडील बिलांचीही तपासणी करणे गरजेचे, बोगस बिलाच्या आधारावर अनेक एजंट गब्बर झाल्याची शंका, चौकशीत सत्य समोर येणारच

बीड :
मजूरी काम करणारे, मिस्त्री, पेंटर अशा बेरोजगार तरुणांच्या नावाने जीएसटी अकाउंट सुरू करायचे आणि त्या नावाने फर्म तयार करून त्या फर्ममधून बोगस बिले देवून कोट्यवधीचा व्यवहार करायचा असे चित्र बीड जिल्ह्यात दिसून येत असून टॅक्स विभागाने बुडीत टॅक्सप्रकरणी काही बेरोजगार तरुणांना नोटीस दिल्यानंतर ही बाब समोर आली असून बीड जिल्ह्यातून कोट्यवधी रुपयांचा जीएसटी टॅक्स बुडीत खात्यात जमा झाल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे अशा बेरोजगार तरुणांना त्यांच्या नावाने बोगस जीएसटी अकाउंट सुरू आहे याची माहितीही नसल्याचे समोर आले आहे. काही बेरोजगार तरुणांना शासकीय योजनांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड घ्यायचे आणि त्या नावाने जीएसटी अकाउंट उघडायचे असाच काही फंडा बीड जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची माहिती टॅक्स विभागाला मिळाल्यानंतर टॅक्स विभागातील अधिकार्‍यांनी अशा बेरोजगार तरुणांची चौकशी करून त्या तरुणांना दिलासा दिला असला तरी अशा बेरोजगार तरुणांच्या नावाने बनावट जीएसटी अकाउंट सुरू करून देणारी टोळी बीडमध्ये सक्रीय असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

यामुळे फर्ममधून बिले घेणारे कॉन्ट्रॅक्टर, ट्रेडर्सचालक त्याशिवाय इतर व्यापारी अडचणीत आले असून त्या व्यापार्‍यांनाही आता डबल फटका बसत आहे. फक्त व्यापारीच नव्हे तर शासकीय कार्यालयातही शासकीय बिले घेण्यासाठी अशाच बनावट अकाउंटचे बिले देणारी टोळीही सक्रीय असल्याचे दिसून येत असून टॅक्सविभागाने शासकीय कामाचे बिलेही तपासण्याची गरज आहे. बनावट कागदपत्राच्या आधारावर फर्म सुरू करणारे व अशा बोगस फर्ममधून बिले आणून देणारे एजंट कोट्यवधी रुपये कमावून गब्बर झाल्याचे चित्र बीडमध्ये निर्माण झाले असून कोट्यवधी रुपयांचा जीएसटी टॅक्स बुडीत खात्यात जमा होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये काही पतसंस्थाही सामील असल्याचे दिसून येत असून अशा काही पतसंस्थेतून जीएसटी हवाला रॅकेट सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मजूरी काम करणारे मिस्त्री, पेंटर व बेरोजगार तरुण यांच्याकडून कागदपत्र मिळवायचे आणि त्या कागदपत्राच्या आधारावर ऑनलाईन अर्ज करून जीएसटी अकाउंट सुरू करायचे, अशाप्रकारे त्या जीएसटी क्रमांकाच्या अकाउंटवरून फर्म तयार करायचे, त्यानंतर त्या फर्मचे अकाउंट एखाद्या पतसंस्थेत सुरू करायचे असे षडयंत्र सुरू असल्याचे दिसून येत असून त्या फर्मच्या नावाने जीएसटी क्रमांकासहीत गुत्तेदार व काही व्यापार्‍यांना बिल द्यायचे, संबंधित व्यापार्‍यांना जीएसटी क्रमांकासहीत बिल मिळत असल्याने त्या व्यापार्‍यांना असा संभ्रम होतो की, आपल्याला जीएसटी क्रमांकासहीत बिल मिळाले परंतु त्या जीएसटी क्रमांकाचे अकाउंट एखाद्या पतसंस्थेत सुरू असल्याने त्या बिलावरील जीएसटी रक्कम उघडलेल्या पतसंस्थेतील अकाउंटमध्ये जमा व्हायची, अशाप्रकारे टॅक्सविभागाला चुना लाववण्याचे काम बनावट फर्मधारक व काही पतसंस्था करत असल्याची शंका उद्भवली असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा टॅक्स बुडीत खात्यात जमा झाल्याचे दिसून येत आहे. सदरील बाब टॅक्स विभागाच्या काही अधिकार्‍यांच्या निदर्शणास आल्यानंतर त्यांनी संबंधित जीएसटी अकाउंटधारकांना नोटीस पाठविल्या, परंतु संबंधित अकाउंटधारक मजूरीसारखे काम करत असल्याने त्यांना जीएसटी काय? व टॅक्स काय असतो याची माहितीही नव्हती, हे चित्र पाहिल्यानंतर टॅक्सविभागालाही आपली फसवणूक झाली असल्याचे समजून आले असेल.

याप्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर टॅक्स अधिकार्‍यांनी काही व्यापार्‍यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जीएसटी टॅक्स वसूल केल्याची माहिती मिळाली असून अशा बनावट फर्मच्या षडयंत्रात बीडचे अनेक व्यापारी अडकल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी टॅक्सविभागाने उच्चस्तरीय चौकशी करून बनावट कागदपत्राच्या आधारावर फर्म सुरू करणार्‍या व्यक्तींचा शोध घेवून हे रॅकेट उघडकीस आणणे गरजेचे वाटत आहे.

अज्ञात व्यक्तीच्या अकाउंटवरील जीएसटी रक्कम टॅक्सविभागात जमा का झाली नाही?
पेंटर काम करणारे मजूर, मिस्त्रीकाम करणारे व काही बेरोजगार तरुण यांचे कागदपत्र मिळून त्या कागदपत्राच्या आधारावर जीएसटी अकाउंट सुरू केल्याचे दिसून येत आहे. तसेच त्या अकाउंटवर फर्मही सुरू असल्याची माहिती मिळाली असून अज्ञात व्यक्तीच्या नावाने सुरू असलेल्या अकाउंटवरील जीएसटी क्रमांकासहीत बिले दिल्यानंतर त्या क्रमांकावर टॅक्सची रक्कम जमा का झाली नाही? हा महत्त्वाचा प्रश्न असून मिळालेल्या माहितीनुसार त्या जीएसटी क्रमांकाच्या नावाने एखाद्या पतसंस्थेत अकाउंट उघडायचे आणि त्या बिलाची रक्कम त्या अकाउंटमध्ये जमा करायची, एकंदरीत असे चित्र दिसून येत असून त्यामुळे जमा झालेली रक्कम टॅक्सविभागात न जाता त्या पतसंस्थेत जमा होत असल्याचे दिसून येत आहे.

त्यानंतर त्या पतसंस्थेतून जमा झालेली जीएसटीची रक्कम संबंधित फर्मधारक काढून घेत असे अशी चर्चा असून टॅक्सविभागाने काही पतसंस्थेतील अकाउंटची चौकशी करणे गरजेचे वाटत आहे.

अज्ञात व्यक्तीच्या नावाने जीएसटी अकाउंट उघडतेच कसे? अधिकारी सामील असल्याची चर्चा
एखाद्या व्यक्तीचे आधारकार्ड व पॅनकार्ड मिळून त्या आधारावर जीएसटी अकाउंट उघडण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित विभागातील कर्मचार्‍यांनी जीएसटी अकाउंट उघडणारा तो व्यक्ती कोण? तसेच ती फर्म कुठे सुरू होणार याचा प्रत्यक्ष पंचनामा करण्याची जबाबदारी जीएसटी अकाउंट उघडूण देणार्‍या अधिकार्‍यांची आहे. तसेच जीएसटी अकाउंट उघडण्यापूर्वी ओटीपी क्रमांक याची संबंधित व्यक्तीकडून घेणे गरजेचे आहे. तर मग ओटीपी क्रमांक कसा मिळविला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून संबंधित विभागातील काही अधिकारी या रॅकेटमध्ये सामील असल्याची चर्चा जोरात असून अज्ञात व्यक्तीच्या नावाने जीएसटी अकाउंट व फर्म उघडतेच कसे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!