विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रुपालीताईं सहकार्यासह लागल्या कामाला*
===============
गेवराई दि. १५(प्रतिनिधी)
शिवछत्र परिवार हा समाजकारणातून राजकारण करणारा परीवार असून विजयसिंह पंडित हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे आम्हाला घड्याळाचे काम करण्याचा योग आलेला आहे.
या योगाला धरूनच विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या आदेशाने घड्याळाला सर्वाधिक लीड देऊ असे आश्वासन भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा राजेगावच्या माजी सरपंच सौ. रूपालीताई कचरे यांनी दिले.
त्या विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित राजेगाव येथील कॉर्नर बैठकीमध्ये बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित माजी उपसभापती शाम मुळे, शरद कचरे, शरद चव्हाण, सलीम शेख, अशोक शेळके, अंगद कचरे, संभाजी कचरे, अमर साळवे यांची प्रमुख होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विजयसिंह पंडित हे प्रगल्भ व दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये आपला वाटा आपल्याला भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे उमेदवार विधानसभेमध्ये असणे आवश्यक आहे.
म्हणून विजयसिंह पंडित यांच्यासारख्या तरुण, दूरदृष्टी असणाऱ्या सर्वसमावेशक नेतृत्वाला मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी राजेगाव पंचायत समिती गणा मधून मोठी लीड देऊ.
*राजेगाव गणाची मला खंबीर साथ आहे—-विजयसिंह पंडित*
==============
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यावेळी बोलताना म्हणाले की, रूपालीताई या केडर बेस कार्यकर्त्या आहेत. त्या आपल्या सोबत असल्यामुळे राजेगाव गणातून मला चांगले मताधिक्य भेटेल याबद्दल शंका नाही. मी आमदार झाल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देईल.
शिवछत्र परिवार हा सर्वसामावेशक भूमिका घेऊन चालणारा परिवार आहे. जुने कार्यकर्ते व सहकार्य केलेले नवीन कार्यकर्ते यांचा समन्वय साधून विकास करण्याची क्षमता शिवछत्र परिवारामध्ये आहे.
त्यामुळे आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विधानसभेमध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेगाव गावातील व गणतील कार्यकर्ते व मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.