गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारासाठी आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर आणि बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उमापूर मादळमोही आणि पिंपळनेर येथे जाहीर सभा होणार आहेत. या सभांना हजारोच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष कैलास माने यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बदामराव पंडित यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून गावागावात आणि घराघरात त्यांची मशाल पोचली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या गेवराई शहरात विराट सभा झाल्यानंतर दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता उमापूर बाजार तळावर, धाराशिव शिवसेनेचे खा ओमराजे निंबाळकर आणि बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खा बजरंग बप्पा सोनवणे यांची जाहीर सभा होणार आहे.
त्यासोबतच सायंकाळी 5 वाजता खासदार बजरंग सोनवणे हे मादळमोही येथे सभा घेणार असून, सायंकाळी 6 वाजता पिंपळनेर येथेही त्यांची जाहीर सभा होणार आहे. बदामराव पंडित कायम गोरगरिबांसाठी 24 तास उपलब्ध असून प्रत्येक समाजाच्या रास्त मागण्यासाठी पाठीशी असतात.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे साहेब यांच्याही खांद्याला खांदा लावून बदामराव पंडित यांनी अनेक लढ्यामध्ये खंबीरपणे साथ दिलेली आहे. त्यासाठी प्रचारासाठी आज आयोजित केलेल्या या तीनही सभांना त्या त्या भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष कैलास माने यांनी केले आहे.