16.7 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

ताकडगाव व निपाणी जवळका येथील असंख्य कार्यकर्त्यांचा आ.लक्ष्मण पवार यांच्या गटात प्रवेश ; गेवराई ऑटोरिक्षाची विजयी घोडदौड

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई मतदार संघातील झालेल्या विकास कामावर विश्वास ठेवून तालुक्यातील ताकडगाव व निपाणी जवळका येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आ.लक्ष्मण पवार यांच्या गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पुढारी कार्यकर्त्यांना खोटे आश्वासने देऊन बळजबरी प्रवेश घेत आहेत. परंतु आ.लक्ष्मण पवार यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली विकास कामे नजरेसमोर ठेवून निवडणुकीच्या तोंडावर अनेक गावातील तरुण हे आ.पवार यांच्या गोटात दाखल होत असल्याने मतदार संघात ऑटोरिक्षाची विजयी घोडदौड सुरू असल्याचे दिसत आहे.

दरम्यान दि. 16 रोजी तालुक्यातील निपाणी जवळका व ताकडगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यामध्ये निपाणी जवळका येथील अरुण आण्णा काकडे, रोहित जाधव, कचरु काकडे, संजय काकडे, नीलकंठ काकडे, संभाजी काकडे, बाळासाहेब काकडे, अमोल प्रभाळे, गणेश लोणकर, वसंत काकडे, रामप्रभू भापकर, अशोक सातपुते, नवनाथ प्रभाळे, विठ्ठल लोणकर, भारत ढेरे, शिवनाथ चव्हाण, नवनाथ चव्हाण, हेमंत लोणकर, बाबुराव काकडे, सचिन धुमाळ, अनिकेत काळे, महेश जाधव, शेषराज चाभारे, किशोर जाधव, ज्ञानेश्वर देवगुडे, भागवत काकडे, पवन भापकर, नवनाथ प्रभाळे,जगन काकडे, मोहन भापकर, दाजीराम बांगर, मारोती वडमारे यांच्यासह आदींनी जाहीर प्रवेश केला.

यावेळी डिगांबर लोणकर, अमोल प्रभाळे, कृष्णा लोणकर, नवनाथ चव्हाण, दत्ता लोणकर, लिंबाजी काकडे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ताकडगाव येथील राम केदार, माणिकराव केदार, मसुजी केदार, प्रकाशराव केदार, सोनाजीराव डोळस, पंडितराव केदार, बाबुराव केदार, नारायण डोळस, संतोष डोळस, बन्सी शाहू डोळस, बाळासाहेब खंडागळे, सुखदेव डोळस, हिरामण ससाणे, बाळासाहेब केदार, नितीन डोळस, सुरेश केदार, शिवाजी डोळस, विठ्ठलराव जगदाळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यावेळी आ. लक्ष्मण पवार यांनी त्यांचे स्वागत केले. तर निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघातील गावागावातील कार्यकर्ते व सामान्य मतदारांचा आ.लक्ष्मण पवार यांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याने मतदार संघात त्यांची ताकद वाढत आसून विजयाचा मार्ग सुकर होताना दिसून येत आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!