16.7 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या बीड जिल्हाध्यक्ष बालाजी तोंडे, शेख रिजवान

जिल्हा कार्याध्यक्षपदी सोमनाथ धांडे यांची निवड

बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी तोंडे, शेख रिजवान तर कार्याध्यक्षपदी सोमनाथ धांडे यांच्या निवड करण्यात आली. असल्याची घोषणा राज्य समन्वयक संतोष मानुरकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईची बीड जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, यांच्या मान्यतेने राज्य समन्वयक संतोष मानुरकर यांनी घोषित केली असुन जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ता आजबे, आप्पासाहेब महानोर, प्रशांत लहुरीकर सचिवपदी राहुल गायकवाड, सहसचिव नितीन मुंडे, सदस्यपदी गणेश जाधव, उदय नागरगोजे, रामेश्वर जाधव, बंडु दुबाले, मनोज गव्हाणे, निलेश येलगिरे, बाळासाहेब वरकड, निलेश वाघमोडे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ही पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारी, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारी संघटना आहे. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी वाचा फोडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालयात पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकारांचे प्रश्न प्रभावपणे सरकार दरबारी मांडले त्यातून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र दोन महामंडळाचे सरकारने घोषणा केली. संघटनेने सामाजिक आणि समाजाभिमुख उपक्रमामध्ये सातत्याने मोठे योगदान दिले आहे. नव्याने नियुक्त केलेल्या बीड जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी देखील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत सजग राहून सामाजिक उपक्रमांना बळ देतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केला आहे.तर राज्य समन्वयक संतोष मानुरकर यांनी नवीन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ही केवळ संघटना नाही तर पत्रकारांच्या न्याय हक्काची चळवळ आहे. लहान-मोठ्या उपक्रमाच्या माध्यमातून पत्रकार संघ सातत्याने चांगले उपक्रम राबवत राहील असे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!